गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण मध्ये आपले स्वागत आहे. सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेची काही महिन्यांची प्रगती उल्लेखनीय आहे. के. बी. एक्सपोर्टसचे संचालक श्री. सचिनजी यादव संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत. शिस्तप्रिय, नियोजनबद्ध काम, कुठल्याही विषयावर सखोल अभ्यास याचा ध्यास याकरिता त्यांना ओळखले जाते, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या प्रवासाला योग्य गती प्राप्त झाली आहे. काही महिन्यातच अशक्य वाटणारे यश संस्थेने सहज शक्य करून दाखविले आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली संस्था महाराष्ट्र शासन अंतर्गत रजिस्टर्ड आहे (रजि.क्र. एस.ए.टी./ पी.एल.एन./आर.एस.आर./सी.आर./६१७/२०१८-१९/सन २०१८) दिलेल्या सर्व नियम व अटींचे येथे काटेकोरपणे पालन केले जाते. तुमच्या कष्टाच्या कमाईला सुरक्षित ठेऊन त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळण्याच्या हेतूने संस्थेमध्ये अनेक लाभदायी ठेव योजना उपलब्ध आहेत. आपण जाणतो पैसे कमवायला किती कष्ट करावे लागतात.रक्कम छोटी असो अथवा मोठी असो ती कमाई आपल्या करीता किती महत्वाची असते. तुम्ही निश्चिन्त रहावे आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित असावी याकरिता आमचा प्रत्येक कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहे. अनेकांमध्ये प्रतिभा असते मात्र आर्थिक बाजू भक्कम नसल्याने त्यांना त्याच्या प्रतिभेचे व्यवसायात रूपांतर करता येत नाही. अशा सर्व नवंव्यावसायिकांना संस्थेच्या वतीने आर्थिक सहाय्य पुरविले जाते. तसेच महिला सक्षमीकरणात संस्थेला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. याकरिता बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. तुम्हाला वाहन खरेदी करायचे असो अथवा घर, त्यासाठी संस्थेमध्ये विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत.
ग्राहकांना तत्पर सेवा देण्याकरिता सर्व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहे. तत्पर आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जातो. ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ATM कार्ड, NEFT/RTGS/IMPS सेवा, स्वाईप मशीन इ. सेवा उपलब्ध आहेत.