लोकमंगल ठेव (दैनंदिन ठेव) योजना

प्रत्येकवेळी मोठ्या रक्कमेची बचत करणे शक्य असतेच असे नाही. अशा वेळेस जर रोज छोटी- छोटी रक्कम आपण 'लोकमंगल ठेव योजनेमध्ये' ठेवली तर भविष्यात खूप मोठी रक्कम तयार झालेली दिसेल, जी नक्कीच आपल्याला गरजेच्या वेळी उपयोगी येऊ शकते किंवा चांगली गुंतवणूक म्हणूनही राहू शकते.

खाते कोण सुरू करू शकते

  • कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
  • एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे (कमाल 4 व्यक्ती)
  • अशिक्षित व्यक्ती
  • दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
  • कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
  • क्लब, संघ (फक्त नोंदणीकृत असल्यास)
  • स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
  • बँकेचे कर्मचारी
  • वयाची 14 वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी
Galaxy Co-Operative Credit Society
Galaxy Co-Operative Credit Society
Top