'बचत करणे ही काळाची गरज आहे' हे तर आपण जाणतोच. त्यासाठी आपण खूप मेहनतही करतो आणि वेळप्रसंगी काटकसर करून काही पैसे बाजूलाही ठेवतो, जे करणे कधी कधी शक्य नाही होत. पण तेच जर आपण 'आवर्त ठेव योजनेमध्ये' पैसे ठेवले तर बचतीची शिस्त देखील लागेल आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळून भविष्यात आर्थिक बाजू देखील भक्कम होईल.